माझी आई निबंध मराठी - Essay on My Mother in Marathi

माझी आई निबंध मराठी - Essay on My Mother in Marathi

    माझी आई निबंध मराठी 3री, 4थी

    माझ्या आयुष्यात जर कोणी माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला असेल, तर ती माझी आई आहे. तिने मला माझ्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत, ज्या मला पूर्ण आयुष्य कामात येतील. म्हणून मी गर्वाने सांगू इच्छितो की माझी आई माझा गुरु व आदर्श असण्यासोबताच माझ्या जीवनाचा प्रेणास्रोत देखील आहे. आई हा शब्द जरी दोन अक्षरांचा असला तरी या शब्दात संपूर्ण सृष्टि समावलेली आहे, आई हा एक असा शब्द आहे ज्याच्या महत्त्वाबद्दल जितके सांगावे तेवढे कमीच आहे. 

    आपण आई शिवाय सुखी जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आईच्या महानतेचा अंदाज याच गोष्टीवरून लावता येईल की एका वेळेला व्यक्ती देवाचे नाव घेणे विसरेल पण आई चे नाव विसरत नाही. आईला प्रेम व करुणा चे प्रतीक मानले जाते. एक आई जगभराचे कष्ट सहन करून सुद्धा आपल्या मुलाला चांगल्यात चांगली सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करते.  

    आई आपल्या मुलांशी खूप जास्त प्रेम करते. एका वेळेला ती स्वतः उपाशी झोपेल पण आपल्या पोरांना जेवण देणे विसरणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्यांची आई एक शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंत च्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. म्हणूनच आपल्याला आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. कारण एक वेळेला ईश्वर आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही मुलांपासून नाराज होत नाही. हेच कारण आहे की आपल्या जीवनात आईच्या या नात्याला इतर सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे. माझ्या आईचे नाव निलम आहे ती खूपच धार्मिक स्वभावाची स्त्री आहे. ती जास्त शिकलेली नाही आहे. परंतु तरीही तिला सांसारिक गोष्टींचे खूप ज्ञान आहे. ती घरच्या कामात रस घेते.

    माझी आई घरातील सर्व सदस्यांची काळजी घेते. मला एक भाऊ आणि बहीण आहेत. आई आम्हा तीनही भाऊ बहिणीला समान प्रेम करते. जर घरात कोणी आजारी पडले तर आई त्याची दिवस रात्र काळजी घेते. अश्या वेळी ती रात्र रात्र जगून आमची काळजी करते. माझी आई एक दयाळू आणि उदार महिला आहे. ती वेळोवेळी गरिबांना दानधर्म करते. तिला गरीब व भिकारी लोकांना अन्न देण्यात आनंद वाटतो. माझी आई दररोज न चुकता मंदिरात जाते व पवित्र सणांच्या दिवशी उपवास देखील करते. 

    आई आमच्या चारित्र्य विकासावर विशेष लक्ष देते. तिची इच्छा आहे की आम्ही एक आदर्श नागरिक बनो. दररोज संध्याकाळी आई आम्हाला धार्मिक बोधकथा सांगते. व आमचे भविष्य अधिक उज्ज्वल कसे करता येईल या वर ती लक्ष देते. 

    माझ्या आईला सकाळ पासून तर रात्र पर्यन्त कामे करावी लागतात. ती सकाळी 5 वाजता उठून जाते. आमच्या उठण्याआधीच ती आमच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करून ठेवते. नंतर माझ्या शाळेच्या वेळे आधी ती जेवण व माझा डबा तयार करून देते. आम्हाला शाळेत पाठवल्यानंतर ती मंदिरात जाते. जेव्हा ती मंदिरातून परत येते. तेव्हा घरातील इतर कामे आवरते. आणि संध्याकाळी पुन्हा तिला स्वयंपाक करावा लागतो. अश्या पद्धतीने माझी आई दिवसभर व्यस्त असते.

    मला जगातील सर्वात चांगली आई मिळाल्याबद्दल अभिमान आहे. व मी परमेश्वराजवळ आईच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतो. 


    माझी आई निबंध मराठी 5वी, 6वी 

    माझी आई हा विषय माझा खूप आवडता विषय! कारण आपण सर्वकाही बोलतो पण आईविषयी बोलायचं राहूनच जातं…. आई म्हणजे सर्वकाही असतं आपल्यासाठी कारण आपल्या छोट्या विश्वात तीच सारं काही असते अगदी सकाळपासून रात्री झोपलो तरीही . आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ! खरंच आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजेच असते “आई”, काळजीवाहू ,कोमल प्रेमाचं फुल असते आई, घराची शान असते आई, आयुष्यातील मानाचं पान असते आई ! माझी आई एक गृहिणी आहे जी अगदी छान पणे आम्हा सर्वांना सांभाळते. काम आटोपून फावल्या वेळात तिचे छंद जोपासते. तिची कलाकुसर, विणकाम, संस्कारांची ठेवण, वाचन, आधुनिक वैचारिक क्षमता, बागकाम हे सारं काही मला तिच्याकडून शिकायला मिळत आणि ते मलाही आवडतं. माझी आई नेहमी म्हणते, ‘दुसऱ्यावर अवलंबून राहणं ही सर्वात मोठी अपराधीपणाची भावना आहे,जे काही असेल ते स्वतःच करावं भलेही चुकलं तरी चालेल,त्यातून शिकावं’ .

    माझी आई हा विषय समोर आला आणि निरागस चेहरा समोरून तरळून गेला, उभं राहिलं ते अस्तिव जे सातत्याने झटत असतं आपल्या कुटुंबासाठी,कर्तव्यासाठी. खरंच जर विचार केला तर आई हे एक सरळ अस्तित्व आहे का? याच उत्तर नाही असंच आहे, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कष्ट करते, घरातल्यांची काळजी घेते, आई कोण असते?

    अंधळ्याची दृष्टी असते आई! लंगड्याची धाव असते आई! पांगळ्याची चाल असते आई! मुक्याचे बोल असते आई! आई काय नसते कुरूप लेकराच सौंदर्य असते आई! जीवनाचा आधारस्तंभ असते आई! अंगणातील तुळस, दिव्यातील वात, घरातला प्रकाश असते आई! आई लेकरांसाठी सर्व काही करते. ती असते म्हणून घराला घरपण असतं. ती असते म्हणून जगण्याची उमेद मिळते. कधीही नाकारत नाही जी असते फक्त सकारात्मक, शांत, स्तब्ध व्यक्तीत्व, उभारी देणारी व्यक्ती म्हणजे असते आई. आई म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्वतःही नेहमी उत्साही असते त्यामुळे घरचं वातावरण नेहमीच प्रसन्न राहतं.

    घर सांभाळताना संतुलन राखते ते उत्कृष्ठ गृहमंत्री म्हणून! बचतीचा मंत्र जपून जमा खर्च चोख ठेवते ते अर्थमंत्री बनून!

    स्वयंपाक उत्तम सुगरणीचा वसा घेउन, अन्नपूर्णेची उपासना करून, अन्नधान्याचा मान राखून कुटुंबियांना शिकवते ते कृषिमंत्री बनून!

    २४/७ घर नीट नेटकं ठेवते ते संरक्षण मंत्री बनून! स्वतः धीट राहून समस्याना तोंड देते ते महिला सक्षमीकरण दाखवून देण्यासाठी, मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगते ती शिक्षण मंत्री बनून! भरपूर सूर्यप्रकाश वापरून त्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करून घेते ते ऊर्जामंत्री बनून! मुलांवर चांगल्या प्रकारे,शुद्ध भावनेने संस्कार करते ती पालकमंत्री म्हणून! आपल्या संस्कृतीचं भान जपते ती सांस्कृतिक कार्यकारी मंत्री बनून! घरच्यांचं आरोग्य जपते ते एक वैद्यकीय मंत्री बनून! अन्यायाविरुद्ध आवाज उठवते ते सामाजिक न्याय मंत्री म्हणून! अंगणात,परसात,घरी वृक्षारोपण व संवर्धन करते ते पर्यावरण मंत्री बनून! प्राण्यांची निगा राखून त्यांची काळजी घेते ती पशुसंवर्धन मंत्री म्हणून! सामाजिक भान जपत वाहतूक कायदा जपून सक्षमतेने प्रवास करते ती परिवहन मंत्री बनून! इतकं मोठं मंत्रिमंडळ सांभाळते आणि निभावण्याची खरंच जिची क्षमता असते ती असामान्य व्यक्ती म्हणजे “आई”!

    एक अद्वितीय मातृत्व, आदर्श पत्नी, सर्वगुणसंपन्न सून ,शालीनतेची आरास अशी लेक आणखीन बऱ्याच नात्यांचे मोती ओवत एक माळ बनवून तिचा घट्ट धागा जो ते मोती विस्कटू देत नाही असा धागा म्हणजे असते आई! प्रेम म्हणजे काय जीच्याकडे पाहूनच कळते आणि जाणिवेचा वसा जपणारी अशी ती माता.


    Mazi aai Marathi nibandh for Class 8 & 9

    ‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. ‘आई’ या शब्दातच किती मोठे अर्थ दडलंय नाही! किती मोठा सामर्थ्य आहे या शब्दात. आई हा शब्द जितका छोटासा वाटतो पण या शब्दात सर्वांचेच विश्व सामावलेले आहे. माँ, मम्मा,मॉम असे कित्येक तरी शब्दांचा अर्थ मात्र तितका जिवलग आणि प्रेमळ असतो. आई आणि मुलं यांच्या सारख गोड नातं शोधूनही सापडणार नाही. अस्तित्वाची लढाई हि प्रत्येकाची वेगवेगळी नक्कीच असते मात्र या लढाईत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे आई. आई आपली सोबत कधीच सोडत नाही. ती नेहमी आपल्या सोबत असते.प्रत्येकाच्या आयुष्यात तिचा स्थान सर्वोच्च असता. आज आपण जे आहोत त्यात मोठा वाट हा आपल्या आईचाच. आपल्या लहानपणापासून आजअखेर आलेल्या प्रत्येक सुख दुःखाला ती समोर गेलीय आणि तिच्या त्या धाडसाने इथवरच प्रवास आपण सोप्पं करत आलो आहोत. मुलांकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता निस्सीम प्रेम करणारी जगातली एकमेव व्यक्ती म्हणजे आई. म्हणतात ना, देवाला सगळीकडे जात येणार नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.

    आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही

    म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई

    मुलांनो शिकणे अ आ ई

    तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तिन्ही त्रिकाळी

    देवा नंतर नमवी मस्तक आईच्या पायी

    आई असेल तर घराला शोभा येते. आई नसली की घर खूप सुनंसुनं वाटतं. आई सतत आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करत असते. सतत त्याच्यासाठी धडपडत असते. आपल्या मुलाला काही कमी पडायला नको याकडे तिच लक्ष असते. स्वतःच्या ताटातली भाकरी देऊन ती उपाशी राहील पण आपल्या बाळाचे पोट भरेल. आई वात्सल्याचा झरा असतो. सर्दी, ताप असताना औषध उपचार करण्याच्या आधी मायेने कपाळावर हात फिरवताच मुलाला बर वाटतं. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच स,र गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो. मग सुरु होते आईची धावपळ, आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठेयत? डबा भरला का? मला नाही हि भाजी आवडत, बेसनची पोळी दे करून. किती ऑर्डर करतो आपण एकापाठोपाठ! पण काढिती त्रागा न करता आई सर्व फर्माईश पुरी करते. या मध्ये घरातील बाकी लोकांचेही वेगळेच आदेश असतात. आजी, आजोबा, बाबा यांच्या मागे धावावे लागते. त्यांना काय हवा नको ते पहाव लागत तेही ना थकता आणि कसलीही तक्रार न करता अगदी आनंदाने ती या गोष्टी आपल्या लोकांसाठी करत असते. कुठून आणते आई एवढा सगळं उत्साह आणि शक्ती देव जाणे!

    जगात आई हीच एक देवता आहे कि जिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही. वि.स.खांडेकर म्हणतात, “ आईचे मन किती वेडे असते! तिला वाटते आपल्या बाळाने लवकर मोठे व्हावे. मोठमोठे पराक्रम करावेत. विजयी वीर म्हणून सगळ्या जगात गाजावे! पण त्याचवेळी तिला वाटत असते की आपले बाळ आपल्या सावलीत सदैव सुरक्षित असावे. काळाला सुद्धा त्याच्या केसाला धक्का लावता येऊ नये.” अशा मातेचे ऋण कधी फिटेल का? छे! विनोबा भावे म्हणतात, “न ऋण फिटे”. आई या दोन अक्षरात श्रुती, स्मृती आहेत. सारी महाकाव्य आहेत. आई म्हणजे माधुर्याचा सागर आणि पावित्र्याचे आगर. फुलांची कोमलता, गंगेची पवित्रता, चंद्राची रामानीयता, सागराची अनंतता, दृष्टीची क्षमाशीलता. पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल तर आईजवळ क्षणभर बस. तुम्हाला सारे मिळेल. म्हणून त्या आईची सेवा करा. मातेची सेवा करणाऱ्यांना दीर्घायुष्य, यश, स्वर्ग, कीर्ती, पुण्य, बळ, लक्ष्मी, सुख, इत्यादी प्राप्त होतात. ग.दि. माडगूळकर म्हणतात,

    नको रे बाळा, करू मातेची हेळणा

    नयनांचा केला दिवा, तळहाताच्या पाळणा.


    माझी आई निबंध मराठी 10वी - Mazi aai Marathi nibandh for Class 10

    आईची थोरवी वर्णन करताना महात्मा गांधी म्हणतात, ‘एक चांगली आई शंभर शिक्षकांहून श्रेष्ठ असते!’ साने गुरुजी म्हणतात, ‘ आई मुलाला जे अंगाई गीत गाते, त्याला पाळण्यात हलवताना, मांडीवर निजवताना, कुशीत थोपटताना ज्या गोड गोड ओव्या म्हणते त्या सारा आयुर्वेद सामावलेला असतो.’ महान व्यक्तींना घडवणाऱ्या अशा माता होत्या. त्या मातांपैकी एका मातेचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे जिजाऊ मातेचा. हिंदवी स्वराज्याच्या स्थापने बरोबर साऱ्या विश्वातील मातांवर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचा नाश करण्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांना जिजाऊ मातेनेच सावरले ना? साने गुरुजींवर त्यांच्या आई खूप चांगले संस्कार केले. साने गुरुजी म्हणतात, “अशी माझी आई होती. तिनेच मला घडवले, माझ्या हृदयात उदात्त विचार रुजवले. साऱ्या मानवजाती विषयीच्या प्रेमाचे, करुणेचे,कधीही न आटणारा निर्झर निर्माण केला तिने माझ्या अंतःकरणात. आज मी जो आहे तो तिने मला जसा घडविले तसा.” तुकाराम महाराजांनी आईची थोरवी गायली आहेत. ते म्हणतात, “जगातील इतर माणसे प्रेम करतील, वात्सल्य दाखवतील, जवळ करतील पण त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. दुसऱ्याचे हित होण्यात त्यांची भूमिका स्वतःच्या हिताय बांधलेली असते पण आईची भूमीका अशी नसते.

    आई! प्रेमाचा अथांग सागर ! मुलांच्या जीवनाला आकार देणारी वात्सल्यमूर्ती. कधी रागावणारी, मारणारी, खस्ता खाणारी! पण मुलांच्या भल्यासाठी अखंड झटणारी. आईचे प्रेम, तिने केलेले संस्कार, तिच्या शिकवणुकीचा चार शब्द या साऱ्याचा आपल्या जडणघडणीत किती मोठा वाट असतो. हि शिदोरी जीवनाच्या सोबतीला असते. संघर्षाच्या, सुख-दुःखाच्या कसोटीत प्रसंगात मोलाची ठरते. आईला “आई” म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही. ईश्वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणी असेल तर ती म्हणजे माता होय. ‘ न मातुः परम दैवतः’ म्हणजे आईसारखे दुसरे दैवत नाही.

    आई कधीकधी रागावते, कधीकधी चार फटाके मारते. पण ते मुलाच्या चांगल्यासाठी असते. ती ओरडते मारते पण नंतर ती त्यापेक्षा जास्ती लाड करते. मुलाचे अनेक अपराध आई आपल्या पोटात घालते. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळात असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. आई देह देते, मनही देते जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारी तीच.

    ज्याच्याजवळ आई आहे तो या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. म्हणतात ना, “ स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” हे अगदी खरा आहे. तुम्ही या सर्व जगाचा मालक बानू शकता पण तुमच्याजवळ आई नसेल तर तुम्ही सर्व काही असूनसुद्धा भिकारी असल्यासारखा आहे. त्यासाठी आपण जिवंतपणी आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे. तिच्या म्हातारपणी तिला आधार दिला पाहिजे. तिला काय हव नको ते पहिल पाहिजे.

    आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू

    सौख्याचा सागरू , आई माझी

    प्रीतीचे माहेर, अमृताची धार

    मांगल्याचे सार, आई माझी

    आईची माया उबदार असते. तिच्या कुशीत आपल्याला हायसे वाटते. आपल्या स्वप्नांना जागवत ती रात्रभर जागी असते. आई फक्त श्री गणेशा किंवा अ आ इ ई शिकवत नाही तर मुलाच्या आयुष्याचा श्री गणेश तीच करते. बोलायला शिकवते, चालायला शिकवते, लिहायला शिकवते, वागायला शिकवते खरा म्हणजे तिने चांगले संस्कार करून ती जगण्याची एक दृष्टी मुलाला देते. “वडिलांविषयी लिहिताना आभाळाएवढा कागद पुरत नाही, अन आई विषयी लिहिताना समुद्र एवढी शाई..” ही उक्ती एकदम खरी आहे. आई वडिलांची थोरवी खूप अगाध आहे. शब्दात मांडता येणार नाहीत आणि कधीही त्याची परफेड करता येणार नाही.

    आजकाल मुलं परदेशात निघून जातात. म्हाताऱ्या आई वडिलांना एकट्याला मायदेशात सोडून जातात. पैसे पाठवून देतात पण त्यांची साथ देत नाहीत वर्ष वर्ष आईवडिलांकडे येत नाहीत. ज्या मुलांना आई मोठा करते तिलाच आजकाल मुलं बोलतात कि “ आई कुठे काय करते, आई तर घरातच असते” पण घरातील काम हे काही सोपे काम नसते आणि ते आव्हान ती हसत खेळात पेलते . त्यात ती कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता.

    घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात. शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात. पायाला ठेच लागली कि पहिला शब्द तोंडात येतो तो “आई ग” मग आई धावत येऊन औषध लावते. आपल्याला जवळ घेते. तिच्या पंखाखाली मग सगळे दुःख विसरल्यासारखे होते. बाबा ओरडले तर जवळ आई घेते. आपल्याला त्रास झाला कि आईचे डोळे आपोआप पाणावतात. आपल्या आईचे उपकार जर आपल्याला फेडायचे असतील तर तिच्या कष्टाचे चीज करणे आपले कर्तव्य आहे हे जाणले पाहिजे. तिच्यासाठी आपले आयुष्य दिले पाहिजे कारण आपल्या जीवनात कोणीही आले तरी आईची जागा तिची तिलाच द्यावी. तीच अपमान करू नये. काही चुकला तर लगेच माफी मागावी तिच्याशी अबोला धरू नये. कारण तिचा आहे जिच्यामुळे तुम्ही जग बघत आहेत. आई तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने जास्ती ओळखत असते हे नेहमी ज्ञानात राहूद्या. आपण आपल्या आईसाठी एवढ तरी नक्कीच करू शकतो.

    “दिला जन्म तू, विश्व हे दाविलेस

    किती कष्ट माये सुखे साहिलेस ,

    जिण्यालागी आकार माझ्या दिलास ,

    तुझ्या वंदितो माउली पाउलास!”


    माझी आई निबंध मराठी 11वी 12वी

    आई ही या जगातील सर्वात निस्वार्थी व्यक्ती आहे जी आपल्या मुलांना या जगात येण्याआधीच त्यांच्यावर प्रेम करायला लागते. या जगात आईच्या प्रेमाशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही कारण ते प्रेमाचे शुद्ध रूप आहे. आई तिच्या मुलासाठी देवदूतासारखी असते, जी नेहमी तिच्या मुलावर प्रेम करते आणि त्याला/तिला आधार देते.

    प्रत्येक मुलासाठी, त्याच्या आईचे त्याच्या हृदयात विशेष स्थान असते कारण ती तिच्या जन्मानंतर मुलाला पाहणारी पहिली व्यक्ती असते. हेच कारण आहे की एक मूल आणि आई यांच्यामध्ये एक विशेष बंधन आहे. परंतु सर्वच लोकांना अनेक कारणांमुळे त्यांच्या आयुष्यात आईचे प्रेम मिळण्याइतके भाग्यवान नाही. ज्यांच्यासोबत त्यांची आई आहे त्यांनी तिच्यावर प्रेम आणि आदर केला पाहिजे.

    आई ही देवाकडून मुलासाठी सर्वात मोठी भेट आहे. ती आई आहे जी आपल्या मुलांवर त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता नेहमीच प्रेम करते. स्त्रिया जन्मजात चांगल्या आई आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, पण आई झाल्यावर त्यांना आई-प्रेमाची शक्ती कळते. आई आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी काहीही करू शकते आणि ती मुलाचा प्राथमिक आधार आहे. ती केवळ मुलाला नैतिक आधार देत नाही तर तिच्या मुलाला आयुष्यात एक चांगली व्यक्ती बनण्यास तयार करते.

    एक आई तिच्या मुलाच्या आयुष्यात तिच्या मुलाचा पहिला मित्र होण्यापासून ते त्याला मार्गदर्शन करणार्‍या मार्गदर्शकापर्यंत अनेक भूमिका बजावते आणि ती कोणत्याही तक्रारी किंवा संकोच न करता समर्पितपणे या सर्व भूमिका बजावते.

    एक चांगला मित्र म्हणून आई : आई ही तिच्या मुलाची पहिली चांगली मैत्रीण असते जी तिच्या मुलाच्या जन्मानंतर लगेचच त्याच्याशी विशेष बंधन बनवते. ती तिच्या मुलांच्या सर्व गरजा समजून घेते आणि नेहमी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. माझी आई सुद्धा माझी चांगली मैत्रीण आहे. खरं तर, मी त्याच्याबरोबर माझी सर्व रहस्ये आणि इच्छा सामायिक करू शकतो. ती मला नेहमी समजून घेते आणि मला आधार देते.

    आम्ही एकत्र अनेक खेळ खेळतो आणि आमचा आवडता खेळ लुडो आहे. मी जिंकू शकलो म्हणून अनेक वेळा ती आनंदाने गेम हरली. मला काय आवडते हे तिला माहित आहे आणि माझे आवडते अन्न शिजवून मला नेहमी आनंदी करते. मी माझ्या आयुष्यात माझी सर्वात चांगली मैत्रीण म्हणून माझी आई आहे हे माझे भाग्य आहे.

    आई एक मार्गदर्शक म्हणून : आई ही फक्त मुलाची पहिली चांगली मैत्रीण नाही तर ती/तिची मार्गदर्शक देखील आहे जी आपल्या मुलांना आयुष्यातील सर्व यश मिळवण्यासाठी नेहमीच समर्थन आणि मार्गदर्शन करते. एक उत्तम मार्गदर्शक तो असतो जो तुम्हाला नेहमी बरोबर काय आणि अयोग्य काय हे शिकवतो. एक मार्गदर्शक केवळ आपल्याला समर्थन देत नाही तर आवश्यक असल्यास आपल्याशी कठोर बनतो. आणि आपण सर्व आपल्या आईमध्ये हे गुण पाहू शकतो.

    माझी आई खरोखरच माझी मार्गदर्शक आहे कारण तिने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मला मार्गदर्शन केले आहेच पण जेव्हा जेव्हा मला तिची गरज असेल तेव्हा मला मदत करते. जेव्हा मी कोणतीही चूक करतो, तेव्हा ती माझी चूक समजून घेण्यासाठी माझ्याशी कठोर बनते. पण लवकरच ती माझ्यावर तिच्या प्रेमाचा वर्षाव करते आणि माझ्या निर्णयात मला नेहमीच पाठिंबा देते.

    ती मला माझ्या अभ्यासात मदत करते आणि मला माझ्या कारकीर्दीबद्दल गंभीर होण्यास सांगते. ती मला सांस्कृतिक आणि नैतिक दोन्ही मूल्ये शिकवते. आईपेक्षा चांगला मार्गदर्शक असू शकत नाही कारण तिला माहित आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्तम पसंत करते.

    काळजीवाहक म्हणून आई : आईप्रमाणे कोणीही आपली काळजी घेऊ शकत नाही. ती तिच्या मुलाचा जन्म झाल्यापासून तिची निस्वार्थपणे काळजी घेते. तिला तिच्या मुलाच्या सर्व गरजा माहीत आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात. ती नेहमीच तिच्या मुलांसाठी असते.

    जेव्हा जेव्हा आपण आजारी पडतो किंवा आजारी पडतो, तेव्हा ती आपली आई असते जी तिच्या आरोग्याची चिंता न करता आपली काळजी घेते. आईसाठी, तिच्या मुलांचे कल्याण अत्यंत महत्वाचे आहे आणि ती नेहमी याची खात्री करते की तिची मुले जिथे असतील तिथे सुरक्षित आणि संरक्षित राहतील.

    आई आपल्या मुलाला सर्व सोई पुरवते. आईच मुलांसाठी घर आनंदी आणि सुरक्षित बनवते. ती एक सुपरवुमन सारखी आहे जी घरातील काम आणि तिच्या मुलांप्रती तिच्या जबाबदाऱ्या दोन्ही सांभाळू शकते. माझ्या आईबद्दल बोलणे, ती आराध्य आणि दयाळू आहे. ती माझ्या सर्व मित्रांवर आणि माझ्यावर प्रेम करते. जेव्हा मी आजारी पडतो तेव्हा तिला माझी काळजी वाटते. ती नेहमी माझ्या आरोग्याची आणि माझ्या गरजांची काळजी घेते. मी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आणि तिच्याशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही.

    आपल्या जीवनाची एक विशेष व्यक्ती म्हणून आई : ईश्वरानंतर, ही आपली आई आहे जी आपल्या अंतःकरणात आणि आपल्या जीवनात सर्वात खास स्थान आहे. मुलाच्या जन्मापासून, आई त्याच्याशी एक अनमोल आणि विशेष बंधन बनवते. स्वतःचा विचार न करता, ती तिच्या मुलाबद्दल आणि त्याच्या आनंदाबद्दल विचार करते. ती आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस काम करते जेणेकरून ती त्यांना आनंदी करू शकेल. मातृत्व हा स्त्रीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि ती निःस्वार्थपणे तिला सर्वोत्तम देते.

    नवजात मूल तिच्या आईला तिच्या अनोख्या सुगंधाने ओळखते. आणि आपण बोलणे सुरू करण्यापूर्वी, आपल्या आईला आपल्या कृतीतून आपल्या गरजा समजतात. हे सर्व कारण आहे की आई आणि मूल एक विशेष बंधन सामायिक करतात, ज्याचे वर्णन शब्दात करता येत नाही.

    आईला फक्त तिच्या मुलाची उन्नती हवी असते आणि ती साध्य करण्यासाठी, कधीकधी ती तिच्या मुलाला आधार देते आणि कधीकधी त्याच्याशी कठोर बनते. पण तिचा हेतू नेहमीच शुद्ध आणि प्रामाणिक असतो. तिला नेहमीच आमच्यासाठी सर्वोत्तम हवे असते आणि ती आपल्याला सर्वोत्तम देण्यासाठी सर्व काही करते.

    जेव्हा आपण मोठे होतो, तेव्हा आपण आपले आयुष्य आपल्या अटींवर घालवू इच्छितो आणि असे करताना अनेक वेळा आपण आपल्या पालकांचा गैरसमज करतो. आपण कधीकधी स्वार्थी बनतो आणि तिचे प्रेम समजून घेण्यात अपयशी ठरतो, पण ती कधीही तक्रार करत नाही किंवा आमच्याकडून कशाचीही मागणी करत नाही. तिला फक्त तिच्या मुलाकडून थोडा आदर आणि प्रेम हवे आहे आणि प्रत्येक मुलाने तिला ते प्रदान केले पाहिजे.

    निष्कर्ष : आईचे प्रेम हे या जगातील प्रेमाचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे आणि आई हा देवाकडून मुलासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. लहानपणी, आपल्या आईच्या त्यागाचे आणि प्रयत्नांना महत्त्व देण्याची आपली जबाबदारी आहे कारण तिला फक्त तिच्या मुलाचे भले व्हायचे आहे. आपण आपल्या आयुष्यात आई मिळवण्यासाठी खूप भाग्यवान आहोत आणि आपण आपल्या आईचा आदर केला पाहिजे. आपण तिला सर्व आनंद आणि प्रेम दिले पाहिजे कारण ती तिच्यासाठी तिच्या सर्व नि: स्वार्थ प्रेमाच्या बदल्यात पात्र आहे.

    Related articles

    माझी आई निबंध मराठी - My Mother Essay in Marathi


    SHARE THIS

    Author:

    Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.

    0 Comments: